🕒 1 min read
मुंबई : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे २०२० प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व भीषण परिस्थितीला केंद्र व राज्य सरकारला जबाबदार धरल असून त्यांनी या दोन्ही सरकावर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
‘कोरोनाची दुसरी लाट येणार हे नोव्हेंबरपासून सांगण्यात येत होते. परंतु केंद्र व राज्य सरकार दोघांनीही दुर्लक्ष केले. व्हेंटिलेटर,ऑक्सिजन कसलीच सोय केली नाही. ज्यामुळे अनेक लोकं दगावले. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला विचारल्याप्रमाणे यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’ असा सवाल त्यांनी ट्वीट करून विचारला आहे.
कोरोना #COVID19 ची दुसरी लाट येणार हे नोव्हेंबरपासून सांगण्यात येत होते. परंतु केंद्र व राज्य सरकार दोघांनीही दुर्लक्ष केले. व्हेंटिलेटर,ऑक्सिजन कसलीच सोय केली नाही. ज्यामुळे अनेक लोकं दगावले. मद्रास HC ने EC ला विचारल्याप्रमाणे यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 18, 2021
दरम्यान, देशभर कोरोनाचा हाहाकार असताना देशातील ५ राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून निवडणुकांचे वारे वाहत होते यामुळे कोरोनाचा अधिक पसार झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यामुळे देशातील कोरोनाच्या विध्वंसाला निवडणूक आयोगाला जबाबदार धरून निवडणूक अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल मद्रास हायकोर्टाने विचारला होता.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’
- मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावला, प्रेमी मजनू म्हणाला विवाहांवर पण बंदी आणली तर…
- अनाथांना आधार : पालकांचे कोरोनाने निधन झाल्यास मोफत शिक्षण आणि महिन्याला पेन्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
