Share

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!

Published On: 

औरंगाबाद : गतवर्षीपासून औरंगाबादकरांचा कोरोनाशी लढा सुरु आहे.  शहरातील विविध ठिकाणी बाहेरगावाहून रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक तहान-भूक विसरून आपले आप्त लवकरात लवकर या संकटातून बाहेर येण्याची वाट बघत असतात. मात्र अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. शहरात संचारबंदी लागू असल्याने हॉटेल मेस बंद आहेत. हीच बाब लक्षात घेत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परिवाराने अक्षय तृतीयेपासून शहरात मोफत अन्नदान मोहीम सुरु केली आहे.

औरंगाबाद वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावरील निराधार आणि पोलिस बांधवांना मोफत टिफिन सेवा सुरु करण्यात आली आहे. पोळी, भाजी, मसाले भात, लोणचे गरजू रुग्णांना सुप असे पहिल्या टप्प्यामध्ये जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत रोज सकाळ-संध्याकाळ तीनशे डब्यांचे वाटप चालू आहे. आत्तापर्यंत  एमजीएम  हॉस्पिटल, धुत हॉस्पिटल, अॅपल, लाइफ केअर, वेदांत बाल रुग्णालय, मी अॅड मम्मी बाल रुग्णांलय, सह्याद्री हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटल, गजानन हॉस्पिटल तसेच कर्तव्यावर असलेले सिडको, सेव्हन हिल, एन-६, गजानन महाराज मंदिर येथील पोलिस बांधवांना आणि रस्त्यावरील निराधार नागरिकांना मोफत टिफिनचे वाटप करण्यात येत आहे.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन  परिवारातील बांधव या मोहिमेसाठी गहू, तेल, किराणा, भाजीपाला मदत स्वरूपात देत आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन निःसंकोचपणे मदत करण्याचे आव्हान डब्ल्यूएमओने केले आहे. मोफत टिफिनसाठी प्रबंधक विशाल विराळे, पवन लाटे, रामेश्वर घाईत, नवनाथ देवढे, अमोल जाधव, आदी परिश्रम घेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!