मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील अनेकदा महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत असल्याचं दिसून आलं आहे. तर, महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत असतात. यामुळे अमृता फडणवीस या अनेकदा ट्रोल होतात.
आता अमृता फडणवीस या त्यांच्या काल पासूनचा ट्विट्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है , देखें अबके किसका नंबर आता है !’ असं ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है
महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !! https://t.co/rN7drFeiTu— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
‘तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!’ असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं होतं. आता आज अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करून डरकाळी दिली आहे. ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !’ अशी चपराकच त्यांनी विरोधकांना लगावली आहे.
जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो,
शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती !#tuesdaymotivations #tuesdayvibe— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 18, 2021
महत्वाच्या बातम्या
- महिंद्रा तुस्सी ग्रेट हो ! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना देणार पाच वर्षांचा पगार आणि…
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना लस ९ महिन्यानंतर ? केंद्र सरकारला प्रस्ताव
- ‘खत दरवाढीचा फायदा घेऊन विरोधक अफवा पसरवतील, योग्य निर्णय घ्या’
- अनाथांना आधार : पालकांचे कोरोनाने निधन झाल्यास मोफत शिक्षण आणि महिन्याला पेन्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

