🕒 1 min read
पाटणा : देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. गेल्यावर्षीच्या अखेरीस कोरोना आटोक्यात असल्याचं चित्र होतं. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून देशात रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची व मृतांची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे आरोग्य व्यवस्थेवर निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी व कोरोना साखळी तोडण्यासाठी विविध राज्यांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. अशात, अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असतानाच काही लोकांना मात्र याहून दुसऱ्याच गोष्टींमध्ये रस असल्याचं दिसून येत आहे. जेव्हा राज्यांचे मुख्यमंत्री समाज माध्यमातून टाळेबंदी व तत्सम निर्णयांची घोषणा करतात, त्यावर नागरिक भन्नाट प्रतिक्रिया देत असतात.
आता झालं असं, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवत असल्यासंदर्भात एक ट्वीट करून माहिती दिली होती. यावर एका प्रेमी मजनूने प्रतिक्रिया देत आपली व्यथा थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडली आणि या ट्विटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नितीशकुमार यांनी 13 मे रोजी ट्वीट करून माहिती दिली की, कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळं बिहारमध्ये लॉकडाऊन येत्या दहा दिवस म्हणजे 16 ते 25 मे 2021 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर, ‘पंकज कुमार गुप्ता नावाच्या एका मजनूनं कमेंट केली. ‘सर, जर या दरम्यान लग्नासारख्या कार्यक्रमांनाही बंदी घातली असती तर माझ्या गर्लफ्रेंड 19 मे रोजी होणारे लग्नही थांबले असते. आम्ही आयुष्यभर तुमचे आभारी राहिलो असतो.’ असं तो म्हणाला.
सर अगर शादी-ब्याह पे भी रोक लगा देते तो मेरी girlfriend की शादी थी 19 मई को वह भी रुक जाती"
आप का हम जीवन भर आभारी रहेंगे ????????— Pankaj Kumar Gupta (@Pankajgupta890) May 13, 2021
यावर एका मुलीने उत्तर दिलं, ‘पंकज, जेव्हा तू मला सोडून पूजाशी बोलायला गेलास तेव्हा मीसुद्धा खूप रडले होते. आता मी आनंदानं लग्न करीत आहे तर तू आता असं प्लीज करू नको. पण पंकज, जरी मी कोणाशीही लग्न केलं तरी माझ्या हृदयात नेहमी तूच असशील. तू माझ्या लग्नाला नक्की ये, शेवटी तुला पाहून मला विदा व्हायचं आहे.’ आता हे ट्विट नेमकं त्या मजनूच्या लैलाच आहे कि फेक अकाउंट वरून केलं ? याचा काही सुगावा लागला नाही. पण नेटकऱ्यांनी मात्र यांची चांगलीच मजा घेतली.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’
- ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली – उद्धव ठाकरे
- अनाथांना आधार : पालकांचे कोरोनाने निधन झाल्यास मोफत शिक्षण आणि महिन्याला पेन्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
