औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. या अनुशंगाने रस्ते, विश्रामगृह, हॉटेल, हेलिपॅड, साऊंड आणि लाइट शो लावण्यात याव्यात. ज्यामुळे पर्यटक रात्री त्या परिसरात मुक्काम करून पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. याबरोबर जाहिरातबाजी करण्यासाठीही प्रयत्न आवश्यक आहे. याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी केली.
कराड राज्यसभेत म्हणाले की, औरंगाबाद आणि वेरूळ येथे संस्कृती महोत्सवाचे आयोजन करणे आवश्यक आहे. १९८३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये चार स्थळे जाहीर केली. यात अजिंठा व वेरूळच्या लेण्या आहेत. वेरूळ येथे एकूण ३४ लेण्या आहेत. ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर मंदिर व शहाजी महाराज गढी लेणीच्या एक किलोमीटरजवळ आहे. देवगिरी किल्ला वेरूळला जाताना लागतो. दरवर्षी या लेण्या पाहण्यासाठी देश-विदेशातून सुमारे २५ लाख पर्यटक येतात. त्यामुळे या परिसरात पर्यटन सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे.
काही महिन्यांपासून कोरोनानंतर विमान सेवेवर मोठा परिणाम झाला. आता राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जपान, मलेशिया, थायलंड या प्रमुख राष्ट्रांतील पर्यटक अजिंठा आणि वेरूळला भेट देण्यासाठी येतात. राष्ट्रीय पातळीवर जागतिक ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी एखादी स्वतंत्र संस्था निर्माण करता येईल का, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे मत कराड यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- रेल्वे विभागाचा मनमानी कारभार, हैद्राबाद-हडपसर रेल्वे कायमची बंद
- वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात थोडं खरं बोलायला शिका; अमृता फडणवीसांचा पुन्हा प्रहार
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- आणखीन एक बदली प्रकरण, औरंगाबादच्या निलंबित कारागृह अधीक्षकाने मागितले इच्छामरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

