अमरावती: किसान रेल्वे अमरावतीवरून तातडीने सुरू करणे व संत्र्यासह केळी, भाजीपाला, रानभाज्या, सिताफळ, दूध अन्य शेतमालाची पश्चिम विदर्भाच्या विविध केंद्रावरून बुकिंगच्या व्यवस्थेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील व अन्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. रेल्वे विभागाने या प्रस्तावाला मान्यता दर्शवली आहे.
शेतकऱ्यांचा माल देशाच्या विविध बाजारपेठेत किसान रेल्वेच्या माध्यमातून पोहचविण्यासाठी सदर मालाची बुकिंग व रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती मिळण्यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात येईल. या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुकिंग करण्याची सोय असेल व या सर्वबाबींचे नियोजन ताबडतोब करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सांगितले.
तसेच संत्र्याचे पीक हाताशी आले असल्याने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल बांग्लादेशमध्ये कमी वेळ आणि कमी खर्चात निर्यात करण्यासाठी विशेष किसान रेल अमरावती जिल्ह्यातील व विदर्भातील विविध केंद्रावरून सुरू करण्याचेही नियोजन होणार आहे.
अमरावतीवरून किसान रेल सुरू करण्याची पश्चिम विदर्भ विकास परिषदेची मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केवळ ऐकलीच नाही तर या मागणीला नियोजनाची जोड देऊन निर्णयापर्यंत पोहचविले त्याबद्दल पश्चिम विदर्भातील शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक व नागरिकांच्यावतीने परिषदेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, संयोजक नितीन भुतडा, निमंत्रक गजानन कोल्हे यांनी नितीनजींचे आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह ईतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात- प्रकाश आंबेडकर
- आरक्षणाबाबत आठ दिवसांत अध्यादेश काढा, अन्यथा जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार!
- कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – अमोल मिटकरीकंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – अमोल मिटकरी
- गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर
- एका महिलेने वाघाची शेळी केली, भाजप नेत्याचा घणाघात


