🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात कंगणा रनौत आणि शिवसेनेतील वाद आता संपताना दिसत असताना आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेत्यांना कुत्रीची उपमा देत जोरदार टोला लगावला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी कंगणा रनौतला पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. यासंदर्भात सरनाईक यांनी ट्विटरवर ट्विट करून टिका केली आहे.
‘कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच’ या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली
आता मारा बोंबा…
जय महाराष्ट्र !
'कुत्रीचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच' या म्हणीचा अर्थ मला आज तंतोतंत कळला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी गेले आठवडाभर कंगनाची बाजू घेतली, त्या सर्वांची तोंडे काळे करून ती आज गेली
आता मारा बोंबा…
जय महाराष्ट्र !— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 14, 2020
असं ट्विट करुन त्यांनी भाजपला टोला लगावला आहे आता यानंतर भाजपकडून कोण काय प्रत्यूत्तर देतं हे याची उत्सुकता आहे.
दरम्यान कंगणाला गृहमंत्रालयाने ‘वाय+’ सुरक्षा देखील देऊ केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.
अभिनेत्री कंगना राणावतवर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगना ड्रग्स घेत असल्याचे अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत सांगितले होते . त्यामुळे कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह ईतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात- प्रकाश आंबेडकर
- आरक्षणाबाबत आठ दिवसांत अध्यादेश काढा, अन्यथा जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार!
- कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – अमोल मिटकरी
- गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
