Share

घाटीच्या ‘या’ सुपर उद्देशाला बसला कोरोनाचा फटका

Published On: 

औरंगाबाद : शहरातील घाटी रुग्णालयात मराठाड्यासह इतर भागातुन असंख्य गोरगरीब जनता उपचारासाठी येते. या घाटी रुग्णालयात गोरगरीब जनतेला अद्यावत रुग्णालयांप्रमाणे सुपर स्पेशालिटी उपचार मिळावे म्हणून घाटी परिसरात भव्यदिव्य अशी सुपर स्पेशालिटी इमारत उभी राहिली. या इमारती साठी केंद्र व राज्य सरकारने दीडशे कोटी निधी खर्च केला. मात्र गेल्या वर्षभरापासुन या इमारतीत फक्त कोरोनाच्या रुग्णावर उपचार केले जात आहे.

केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये तर राज्य सरकारचे ३० कोटी रुपये अशा निधीतुन घाटी परीसरात सुपर स्पेशालीटी इमारत उभी राहिली. २०१६ मध्ये सुरु झालेले इमारतीचे काम हे कोरोना संसर्गामुळे रेंगाळले आहे. २०२० मध्ये आलेल्या कोरोना संसर्गासाठी रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात आली. तेव्हापासुन या इमारतीत कोरोना रुग्णावर उपचार होत आहेत. यामुळे या इमारतीचा मुळ उद्देश हा बाजूलाच राहिला असुन ही इमारत कोरोना रुग्णसेवेत अडकून पडली आहे.

घाटीतील या सुपर स्पेशालिटी इमारतीसाठी २१९ पदांच्या निर्मितीला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या इमारतीत रुग्णांना आठ विभागांमार्फत अतिविशेष वैद्यकीय सेवासुविधा मिळणार आहे. तसेच येथे मेंदूचे उपचार-शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियादेखील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना संसर्गामुळे सुपर स्पेशालिटी इमारत कोरोना रुग्णसेवेत अडकून पडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!