परभणी : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळून आले. मात्र दिलासादायक बाब म्हणजे रविवारी एकाच दिवसात १५२ रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. परभणीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २८९ वर आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ८६० जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ८ हजार २४० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर ३३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
परभणीमध्ये २ हजार ११६ जणांनी घेतला दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या २ हजार ११६ जणांनी ६ मार्चपर्यंत लसीचा दुसरा डोस घेतला. १ मार्चपासून ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील अनुवंशिक आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहे. शनिवारपर्यंत ६० वर्षांवरील ४ हजार ५७० तर ४५ ते ५९ वयोगटातील अनुवंशिक आजार असलेल्या १ हजार ९६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. शनिवारपर्यंत ९ हजार ४३६ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये, दोन नगरपालिका रुग्णालये, चार ग्रामीण रुग्णालये, १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ३ खासगी रुग्णालयांत लस देण्यात आली. शनिवारी ४४३ हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्सना देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोविड सेंटरमध्ये रूम देण्याच्या कारणावरून रुग्णांची नोडल अधिकाऱ्यांना मारहाण
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये हायवा घुसला, झोपलेल्या कामगारांना चिरडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

