Share

बसमधून प्रवास करत असाल तर सावधान! दोन महिलांनी पळवले अडीच लाखांचे दागिने

Published On: 

जालना : बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेचे अडीच लाखांचे दागिने लांबवण्याची घटना समोर आली आहे. ६ मार्च रोजी औरंगाबाद-जालना प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे.

औरंगाबाद येथून एक महिला भावाच्या लग्नासाठी बसने जालन्यात येण्यासाठी प्रवास करीत होती. दरम्यान, करमाड येथून बाजूला बसलेल्या दोन महिलांनी प्रवासात त्यांचं लक्ष नसताना त्यांची पिशवी लंपास केली. या पीशवीत २ लाख ४० हजार रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथील पिसादेवी भागातील रहिवासी अंजली संदीप कुटे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील अधिक तपास सदर बाजार पोलिस ठाण्याचे रुपेकर हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!