Share

शाहिद आफ्रिदीचा जावई ‘हा’ स्टार क्रिकेटपटू ; आफ्रिदीची मुलगी अडकणार लवकरच लग्नबंधनात

Published On: 

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीच्या मुलीचं लवकरच लग्न होणार आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीसोबत शाहिद आफ्रिदीची मुलगी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे.शाहिन आफ्रिदी लवकरच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जावई होणार आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने आफ्रिदीच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार हे वृत्त दिलं आहे. आफ्रिदीची मुलगी अक्सा आफ्रिदी आणि क्रिकेटपटू शाहिन आफ्रिदी यांचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. “शाहिनच्या लग्नासाठी आम्ही शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबियांना अक्साबाबत विचारणा केली होती”, अशी माहिती शाहिनच्या वडिलांनी स्थानिक माध्यमांना दिली.

या दोघांचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. पण याबाबतची कोणतीच औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. शाहिन आता क्रिकेट खेळतोय. तर अक्सा शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे हे दोघे 20 वर्षांचे आहेत. त्यामुळे साखरपुड्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र कुटुंबियांच्या माहितीनुसार लवकरच साखरपुडा उरकण्यात येणार आहे. तर पुढील 2 वर्षानंतर लग्नगाठ बांधण्यात येणार आहे. मात्र याबाबत अजूनही जाहिररित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

‘दोनी कुटुंबाला हे नात मंजूर आहे आणि लवकरच शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आणि फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी यांचा साखरपुडा होईल. साखरपुड्याच्या दोन वर्षात हे दोघं लग्न करतील. अक्साचं शिक्षण संपल्यानंतर लगेचच हा सोहळा पार पडेल,’ असं एहतिशाम उल हक म्हणाले.

शाहिद आफ्रिदी आणि शाहिन शाह आफ्रिदी दोघंही पाकिस्तान सुपर लीग 2021 मध्ये खेळताना दिसले. पण कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 14 मॅचनंतर रद्द करण्यात आली. शाहिन शाह आफ्रिदीने या स्पर्धेत 4 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे मुल्तान सुल्तानकडून खेळताना शाहिद आफ्रिदीनेही 5 विकेट घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!