औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पोलिसांनी सतर्कता दाखवत धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीस हटकले व तरुणाचा जीव वाचवला. यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपींचा पाठलाग केला आणी आरोपीना ताब्यात घेतले. रविवारी सांयकाळी शिंदेवाडी शिवारात ही घटना घडली.
गंगापुर येथील स्थानिक गुन्हे शाखेची पोलिस व्हॅन रविवारी सांयकाळी गंगापुरकडून लासुरकडे जात होती. यादरम्यान शिंदेवाडी शिवारात दोन व्यक्ती वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असलेल्या अजय राजू दहातोंडे याला धारदार शस्त्राने मारहाण करत होते. पोलिस व्हॅनमधील वाल्मिक मेटे यांनी सतर्कता दाखवत व्हॅन थांबवत मारेकऱ्यांना हटकले व तरुणांचे प्राण वाचवले. पोलिसांनी हटकताच मारहाण करणारे आरोपीनी तेथून धुम ठोकली. मात्र पोलिसांनी आरोपींचा चार किलोमीटरपर्यंत पाठलाग करत आरोपीना ताब्यात घेतले.
यात करण मारोती गायकवाड व आकाश देवानंद जाधव या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडील धारदार शस्त्र ताब्यात घेतले. तसेच जखमी अजयला खासगी वाहनाने गंगापूर रुग्णालयात पाठविण्यात आले. गंगापुरात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तिघेही मित्र असून पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असून जखमी अजयची चौकशी केल्यानंतरच हल्ल्याचे खरे कारण समजणार आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर निकम, मुरकुटे, बहुरे या पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न केले.
महत्वाच्या बातम्या
- दिलासादायक: परभणीत १५२ रुग्णांना डिस्चार्ज, २ हजार ११६ जणांनी घेतला दुसरा डोस
- जालन्यात कोरोनाचे २१९ नवे रुग्ण; जिल्ह्यात संचारबंदीची जोरदार चर्चा
- ‘कृपया गोलपोस्ट बदलू नका’ ; ICC वर संतापले रवी शास्त्री
- जुन्या भांडणातून तरुणाला बदडले
- ‘या’ जाचक अटीमुळे शेतकरी पिकविम्यापासुन वंचित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

