जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या आणखी २१९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६६ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जालना तालुक्यातील जालना शहर ११६, माळी पिंपळगाव ०१, इंदेवाडी ०२, दहिफळ काळे १, हिवरा १, नेर ४, बोरखेड २, खापरखेडा, दादावाडी, सावरगाव, अंतरवाला, हिवरा रोशनगाव, टाकरवन, पठण बु., वाघुळ, गोंदेगाव, पळसखेडा १, शेवगा, मंठा तालुक्यात मंठा शहर, बेलोरा २, उसवद १, वाई २, परतूर तालुक्यातील वाटूर ४ यासह २१९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजार ६४७ वर पोहोचला आहे. यापैकी १४ हजरा ९७५ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णलयातून घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या १ हजार २६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मराठवाड्यात औरंगाबादपाठोपाठ जालन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जालन्यातील मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या रुग्णसंखेमुळे प्रशासनासमोरील आव्हाने वाढली आहेत. यामुळे औरंगाबाद पाठोपाठ जालन्यातही संचारबंदी लागू होते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, प्रशासनाने याबाब अद्याप निर्णय घेतलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोविड सेंटरमध्ये रूम देण्याच्या कारणावरून रुग्णांची नोडल अधिकाऱ्यांना मारहाण
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये हायवा घुसला, झोपलेल्या कामगारांना चिरडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

