Share

प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द  

Published On: 

परभणी :  कमी प्रवासी संख्येमुळे काही रेल्वे गाड्या मध्य रेल्वेने कळवल्यानुसार रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गाडी संख्या ०२२७१  मुंबई सी. एस. टी.- जालना जनशताब्दी विशेष गाडी मंगळवारी (दि. २७) एप्रिल ते १० मे २०२१ दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

गाडी संख्या ०२२७२ जालना – मुंबई सीएसटी. जनशताब्दी विशेष गाडी बुधवार (दि. २८) एप्रिल ते ११ मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या ०१४०४ कोल्हापूर ते नागपूर विशेष गाडी सोमवारी ( दि. २६) एप्रिल ते १० मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या ०१४०३ नागपूर ते कोल्हापूर विशेष गाडी मंगळवार (दि. २७) एप्रिल ते ११ मे दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून कळवण्यात आले आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यामधील सर्व जिल्हामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रवाश्यांची ये – जा करणे जवळजवळ थांबलेच आहे.

कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन तसेच संचारबंदी देखील लावण्यात आली आहे. जवळजवळ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोराेना रुग्ण वाढण्याचे प्रमाणात खुप जास्त झाले आहे. तसेच बाजारपेठेसह अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णालये, औषधीचे दुकाने देखील नियमीतपणे त्या – त्या जिल्हामध्ये उघडी ठेवण्याचे आदेश असल्यामुळे खुप अत्यावश्यक तसेच गंभीर बाब असल्याशिवाय प्रवास करण्यासाठी प्रवाशी जात नसल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. प्रवाशी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही रेल्वे रद्द केल्या असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!