जालना : जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. एकदिवसात ४५३ नवे बाधित झाले आहेत. तर आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे जालनेकरांना कोरोनाची चांगलीच धास्ती झाल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात यात आणखीन भर पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. एका दिवसात एवढे बळी जाण्याची कोरोनाकाळातील ही पहिलीच वेळ आहे. बळी गेलेल्यांमध्ये शासकीय रूग्णालयातील पाच तर खासगी रूग्णालयातील तिघांचा समावेश आहे.
कोरोनाची दूसरी लाट आल्याच्या सुरू असलेल्या चर्चेला बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे बळ मिळत आहे. तरीही लोक बिनधास्त असून त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही धास्ती राहिली नसल्याने बाजारात त्यांचा मुक्तसंचार दिसून येतो. जालना जिल्ह्यात बुधवारी गेल्या २४ तासांमध्ये आठ जणांचा बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तीनशे ते चारशे अशा संख्येत असणाऱ्या ॲक्टीव्ह रूग्णांचा आकडा गेल्या काही दिवसात दोन हजाराच्या आसपासच आहे. आज बुधवारी २००२ रूग्ण कोरोना ॲक्टीव्ह असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रणबीर-आलियाच्या संगीतमध्ये ‘या’ गाण्यावर डान्स करणार आई नीतू कपूर ; व्हिडिओ व्हायरल
- …आणि ‘या’ माकडांना वाटतं की, ते बंगालमध्ये जिंकतील ?
- अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या वडिलांचे निधन
- ‘मी पुन्हा येऊ का?’ ‘या’ कॉमेडीयने साधला फडणवीसांवर निशाणा
- ‘त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा’,भाजपा नेत्याची ममतांवर वादग्रस्त टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

