वर्धा : राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी निशुल्क करण्यात येत होता. पण यामुळे राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडत आहे. त्यामुळे मृतांच्या वाढत्या संख्येमुळे आता कोरोना मृतांच्या नातेवाईंकांकडून अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये आकारण्याचा निर्णय वर्धा महानगरपालिकेने घेतला आहे.
गेल्या वर्षभरात येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हजारांवर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेत. त्यासाठी लागणारा खर्च कुणाकडूनही घेण्यात आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. पण, अद्यापपर्यंत प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे वर्धा महानगरपालिकेने नाईलाजाने अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ध्यात अंत्यसंस्कारासाठी पालिकेने महिनाभरात जवळपास 40 लाख रुपये खर्च केलेत. अंत्यसंस्कार व दाह संस्काराची जबाबदारी वर्धा पालिकेने वसुधा वुडलेस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर सोपवली. संस्था ना नफा, ना तोटा तत्त्वावर प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये आकारत आहे. जिल्ह्यातील रूग्णासोबतच अन्य जिल्ह्यातून उपचारसाठी आलेल्या मृतकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च पालिकेने दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मारेंगे भी हम और बचायेंगे भी हम! कोरोना पसरवणाऱ्या चीनच्या लसीला ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी
- आघाडीत बिघाडी? ‘काँग्रेस पक्ष विधानसभा स्वबळावर लढवणार’, नाना पटोलेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
