मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस लस घेतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे.
तन्मय हा चंद्रपूरला राहत असून नागपुरात इंजिनिअरींगचे शिक्षण घेतो. त्याने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नागपुरात नॅशनल कॅन्सर इंस्टाट्युट येथे लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झाल्याचा फोटो शेअर केला. मात्र, त्यावरून ट्रोलिंग झाल्यानंतर तो फोटो डिलिट करण्यात आला. मात्र, अनेकांनी याचे स्क्रिनशॉट घेऊन ठेवल्याने फोटो व्हायरल झाला.
राज्यात लसीकरणाचा साठा देखील कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी वयाच्या अटीमध्ये बसूनसुद्धा अनेकजण लसीकरणापासून वंचित राहिल्याचे दिसून आले. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा लस घेतानाच फोटो व्हायरल झाला. त्यामुळे आधीच राज्यात लशींचा तुटवडा आणि त्यातही वयात बसणाऱ्या नागरिकांना लस मिळत नाहीये. त्यात वयाची ४५ वर्ष पूर्ण न करताच देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी काय मिळाली? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
चाचा विधायक है हमारे l
बडे परेशान रहते बेचारे l
ख्वाब देखते सुबह सवेरे l
चाची के है राजदुलारे ll
चिन्मय, तन्मय, उनको प्यारे
चायवाले के आँख के तारे,
"मै वापस आऊंगा" का गाना
चाची से गवाओगे क्या रे?#ChachaVidhayakHainHumare— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 20, 2021
राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संधी साधली असताना दुसऱ्या बाजूला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील याच मुद्द्यावरून तोफ डागली आहे. एक छोटीशी कविता पोस्ट करत त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी
- …म्हणून अजित पवार नाराज, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार भूमिका ?
- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मुळे जाग्या झाल्या ‘वॉटर एक्सप्रेस’च्या आठवणी
- माजी मंत्री संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक, बुलढाण्यात तणाव वाढला
- …आणि लेक वामिकाला आपल्या छातीशी घट्ट धरलं; पहा आई आणि लेकीचा क्युट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

