Share

संधी असुनही आंद्रे रसलने नाही केले जेमिसनला धावबाद; खरे कारण आले समोर

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीए, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसल शेवटचे षटक टाकत होता. या षटकात आरसीबीचे एबी डिविलियर्स आणि काईल जेमिसन फलंदाजी करत होते. या षटकात रसलने एकुण २१ धावा दिल्या. याच षटकातील पाचवा चेंडु एबीने मारल्यानंतर तो थेट रसलच्या हातात विसावला. त्यावेळी नॉन स्ट्राइकर काईल जेमिसन हा धाव घेण्यासाठी बराच बाहेर आला होता. त्यामुळे रसलला त्याला धावबाद करण्याची चांगली संधी होती. मात्र रसलने त्याला धावबाद करण्याची संधी असुनही बाद न केल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडीयावर प्रश्न उपस्थित केले होते.

https://twitter.com/lodulalit001/status/1383761444739588100

मात्र नतंर असे लक्षात आले की, जेमीसन बाद झाला असता तरी एबी स्ट्राईकवर होता. त्याला बाद करण्यात काहीच अर्थ नव्हता. तसेही डावातील शेवटचा चेंडु शिल्लक होता. त्यामुळे जेमिसनला बाद करण्यात काहीच अर्थ नव्हता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २०४ धावांचा डोंगर उभा केला होता. ग्लेन मॅक्सवेलने ४९ चेंडूत ७८ धावांची खेळी केली होती. तसेच एबी डिविलियर्सने देखील ७६ धावांची खेळी केली होती. हा सामना आरसीबीने ३८ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!