नवी दिल्ली : २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा येऊन देखील विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, कोरोना, वादळ, अतिवृष्टी, भ्रष्टाचार अशा विविध आरोपांवरून भाजपने सरकारची कोंडी केली.
अनेकदा भाजप नेत्यांनी सरकार पडण्याच्या मुहूर्ताचे भाकीत केलं, मात्र हे सरकार स्थिर असून पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेसह महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चे सारथ्य करणाऱ्या अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती, असं सांगतानाच महाराष्ट्रातील अपवित्र आघाडीचं सरकार त्यांच्या ओझ्यामुळेच कोसळेल, असं विधान अमित शाह यांनी केले आहे.
सध्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर एकामागे एक होणारे गंभीर आरोप, दोन मंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळे सरकारवर तणाव निर्माण झाला असतानाच हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच पडेल, असं विधान अमित शाह यांनी केल्यामुळे सध्याच्या परिस्थितीवरून ते काही सुचवू पाहत आहेत का ? असा सवाल निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाजी, फडणविसांबाबत तक्रार करण्यासाठी तुम्ही राज्यपाल आणि मोदीजींना भेटाल का?
- …म्हणून अजित पवार नाराज, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार भूमिका ?
- ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मुळे जाग्या झाल्या ‘वॉटर एक्सप्रेस’च्या आठवणी
- केंद्रातलं सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, त्यानं संपूर्ण देशातला कोरोना नष्ट होईल’
- संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी


