Share

माजी मंत्री संजय कुटे यांच्या गाडीवर दगडफेक, बुलढाण्यात तणाव वाढला

Published On: 

बुलढाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान आणि राज्याचे माजी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत केलेल्या टिकेनंतर माजी आमदार विजयराज शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते निषेध नोंदवित असताना त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी शिवसेना  पदाधिकाऱ्यांवर आणि कोविड प्रतिबंध नियम उल्लघन करत आंदोलन केल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्यांवर  बुलडाणा शहर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान काल भाजपा आमदार डॉ.संजय कुटे हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता बुलडाणा येथून परत जात असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक करून काचा फोडल्या.

ही दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली असून त्यांना अटक झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा संजय कुटे आणि इतर भाजप नेत्यांनी बुलडाण्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतला. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आमदारांवरच्या कारवाई बाबत वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिले. त्यानंतर सर्व भाजप नेते कार्यालयाबाहेर पडले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या बाहेर पदाधिकारी सह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!