🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाविरुद्धचे युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. देशभरात लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. औरंगाबादेतही लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी कोरोना लसीविषयी कोणत्याही अफवेला बळी न पडण्याचे आवाहन पर्यवेक्षक संजय कुलकर्णी यांनी केले.
कोरोना लसीकरण कार्यक्रमात वैद्यकीय-कर्मचारी यांना नोंदणीसाठी कोविन अॅपचा वापर केला जात आहे. लसीकरणाविषयी बोलताना पर्यवेक्षक संजय कुलकर्णी म्हणाले की, कोविड-19 विरुद्धचे युद्ध अंतिम टप्प्यात आहे. ज्या पद्धतीने आपण इतर इंजेक्शन्स किंवा लसी घेतो, त्याप्रमाणेच ही लस घेणेही एकदम सुरक्षित आहे. आपण या लसीबद्दल कोणत्याही अफवेला बळी न पडता सुजाण नागरिक बनून समाजात जागरूकता निर्माण करूया. सामूहिक प्रयत्नांनीच आपल्याला ही लढाई जिंकता येईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दुसरीकडे, प्रत्यक्ष लस घेण्याचा पहिला मान मिळालेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या कोंडपल्ले यांनीही लसीविषयी प्रतिक्रिया दिली. डॉ. कोंडपल्ले यांनी औरंगाबादेतील एन-11च्या मनपा केंद्रात लस घेतली. त्या म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढाईत सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला. प्रशासनाने अत्यंत यशस्वीपणे कोरोनाविरोधात उपाययोजना राबवल्या. आता लस आल्यावरही ती सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. लस अत्यंत सुरक्षित असून जनतेने कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- औरंगजेब दुष्ट होता, मुस्लिमांनाही त्याच्याविषयी राग-चंद्रकांत खैरे
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
