Share

‘धारावीतील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्या’

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोरोनाची रुग्ण संख्या काही कमी होत नाही आहे.

मुंबईत दररोज हजारो रुग्ण आढळत आहेत. मुंबईतील सर्वात दाट वस्ती आणि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा संसर्ग वाढला तर आणखी भयानक परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे या धारावीतील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

‘गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी कोरोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवलं होतं. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय’, असं राहुल शेवाळे म्हणाले

‘धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल, तसेच एक अनोखं उदाहरण यानिमीत्ताने सादर करता येईल’, असंही ते पत्रात म्हणाले.

दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत. आज रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच गोरगरीब जनतेचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या काळात शिवभोजन मोफत देण्यात येणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!