Share

‘किमान आतातरी गोरगरीबांचे वीज कनेक्शन तोडू नका’

Published On: 

बुलडाणा : राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना १५ दिवस घरीच बसून राहायचे आहे. त्यामुळे किमान आतातरी गोरगरीबांचे वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी विधानसभेतील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

चिखली विधानसभा मतदार संघातील आमदार श्वेता महाले पाटील यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राज्य सरकारने शेतकरी व बारा बलुतेदारांना मदत जाहीर न करताच पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १५ दिवस सर्वांना घरीच थांबून रहायचे आहे, किमान आत्तातरी गोरगरीबांच्या वीजकनेक्शन तोडणं थांबवा आणि तोडलेल्या वीजजोडण्या तातडीने पुन्ळा जोडून द्याव्यात.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

वीज कनेक्शन तोडण्यावरुन राज्यात महाविकास आघाडी सरकारवर या आधी देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. अधिवेशन काळात विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे अधिवेशन होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणी थांबवण्यात आली होती. तसे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, अधिवेशन संपताच, वीज बिल वसूली मोहिम पुन्हा सुरू करण्यात आली होती. आता लॉकडाऊन काळात तरी वीज तोडणी करू नये अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!