Share

…आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं ? चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

Published On: 

मुंबई : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. अनेक रुग्णालये भरली असून बेड्स शिल्लक नाहीयेत. यामुळे मुंबईमध्ये शासकीय क्वारंटाईन सेंटर्स देखील भरत असल्याने हॉटेल्समध्ये क्वारंटाईन सेंटर्स निर्माण करण्यात आले आहे.

दरम्यन, अंधेरीतील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये आरोग्य सेवकानेच महिलेची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून राज्य सरकारसह प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं ? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

‘वाढत्या कोरोनामुळे मुंबईत शासकीय सोबतच हॉटेल्स मध्येही क्वारंटाईनसेंटर्स उभारलेत अंधेरीतील अशाच क्वारंटाईन हॉटेलमध्ये तिथल्याच आरोग्यसेवकाने कोरोनाग्रस्त महिलेची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार घडलायं आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं याचं उत्तर सरकारने द्यावं,’ असं भाष्य चित्रा वाघ यांनी केलं आहे.

यासोबतच, ‘संबंधित आरोपीवर कारवाई व्हावीच पण ज्या प्रशासन अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला त्यालाही यात सहआरोपी करा मागे ही सेंटर्सवर १४ विनयभंग ४ बलात्कार झाले कुठल्या आणि किती अधिकार्यावर सरकारने कारवाई केली? महिला ॲडमिट झाल्यावर डिस्चार्ज होईपर्यंत जबाबदारी कुणाची ?’ असे सवाल देखील चित्रा वाघ यांनी विचारले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!