Share

१६ खासगी रुग्णालय आता डीसीएचसी सेंटर! ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा

Published On: 

औरंगाबाद : ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या अनुषंगाने तसेच शहरातील घाटी रुग्णालय, मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) व खासगी रुग्णालयांचा भार कमी करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील १६ खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे खेडोपाड्यातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहर व जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णदेखील मोठया संख्येने शहराकडे धाव घेतात. याचा ताण स्थानिक आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने सोमवार, १२ रोजी जिल्हा प्रशासनाने एक बैठक घेतली. यात, ग्रामीण भागातील कोव्हीड उपचार करू शकणार्‍या एकूण १६ सक्षम खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे अधिकार दिले आहेत.

हे करत असताना रुग्णालयातील उपचार यंत्रणा, बेड्सची संख्या, आयसोलेशन बेड्स, ऑक्सीजन बेड्स, व्हेन्टिलेटर्स, आयसीयू बेड्स आदी अटी घालण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार या डीसीएचसीमध्ये उपचार मिळणार आहेत. तसेच शासनाच्या सर्व अटी-शर्ती पाळणे बंधनकारक आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या अधिनस्त पथकाडून या सर्व डिसीएचसीची बारकाईने तपासणी व मूल्यमापन केले जाणार आहे. यात दोषी आढळ्यास डिसीएचसीची मान्यता काढून घेण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. या सर्व डीसीएचसी रुग्णालयांना अद्यावत दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे बांधकारक राहील.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!