🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यसह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. पण तरीही रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. घाटी रुग्णालयात आणखी अठरा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे घाटी प्रशासनाने आज दुपारी जाहीर केले आहे. त्यात जळगाव, बुलढाणा आणि भोकरदन येथील रुग्णांचा देखील समावेश आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत एकूण १३९५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज दुपारी आलेल्या घाटीच्या अहवालानुसार अठरा रुग्णांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५८ वर्षीय पुरूष, लोणी बुद्रुक औरंगाबाद येथील ७० वर्षीय पुरुष, झाल्टा औरंगाबाद येथील ७८ वर्षीय स्त्री, वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, गरमपाणी येथील ५३ वर्षीय पुरुष, एसटी कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष, उस्मानपुरा येथील ६२ वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील ७३ वर्षीय पुरुष दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पहाडसिंगपुरा येथील ८२ वर्षीय स्त्री, पंचशीलनगर वैजापूर येथील ७० वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ७० वर्षीय पुरुष, भावसिंगपूरा येथील ७९ वर्षीय स्त्री, एन-२ हडको येथील ६२ वर्षीय पुरुष, सिटी औरंगाबाद येथील ६३ वर्षीय स्त्री रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर जळगाव येथील सोनवड, धरणगाव येथील ५० वर्षीय पुरुष, साखरखेडा बुलढाणा येथील ६० वर्षीय पुरुष, भोकरदन आव्हाना येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णांचा घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सध्या भारताशी व्यापारी संबंध ठेऊ इच्छित नाही आयातीचा प्रस्ताव फेटाळत इम्रान खान यांचा निर्णय
- कधीतरी खरं बोला रे नाही तर लोकं तुमच्यावर शेण फेकून मारतील, निलेश राणेंचा मलिकांना टोला
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- नांदेड जिल्हा; कोरोना रुग्णांना लूटणाऱ्या खासगी लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
- ‘मास्क वापरला तर ब्युटी पार्लर कसे चालणार ?’ आसामच्या आरोग्य मंत्र्यांच अजब विधान

