जालना: शहरात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहीजण विनाकारण रस्त्यावर घराच्या बाहेर पडत आहेत, या पार्श्वभूमीवर सोमवारपासून जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजन टेस्ट करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु करताच मामा चौक येथे रस्त्यावर फिरणाऱ्याची चौकशी करुन कोरोना चाचणीचे नमुने घेतले आसता त्यामध्ये दिवसभरात एकूण १८५ नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात पाच नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
काही नागरिक काम नसताना घरा बाहेर पडतात यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, जालना शहरातील मामा चौकात विनाकारण बसणाऱ्यांची आणि शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. दुपारपर्यंत केलेल्या कोरोना चाचणीत ३ जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बेड, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेड,रेमडिसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे तसेच आरोग्य यंत्रेणेवर ताण पडला असुन तरी काही नागरिक विनाकारण घरा बाहेर पडत आहे. तसेच अशी कारवाई रोज सुरू राहणार असून विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
पोलिस यंत्रणेवर ताण पडला आहे अशी खंत काही पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, पोलिसांनी आता रस्त्यावर फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी या वेळी बोलताना सांगितले. या कारवाईदरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक विनायक देशमुख हेही रस्त्यावर उतरत असून मामा चौकातील कारवाई सुरू असताना त्यांनी मामा चौकात येऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला रुग्णालय मिळेना; BSF जवानाची हतबलता
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- आयपीएलमध्ये आज केकेआर विरुद्ध सीएसके; केकेआरपुढे पराभवाची मालिका खंडीत करण्याचे आव्हान
- आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; पहिल्या विजयासाठी हैदराबाद उत्सुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

