रिवा : देशात कोरोना संसर्गाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत आहे. यामुळे देशातील आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात अपुऱ्या पडत असल्याचं चित्र समोर येत आहे. अनेक राज्यांमधली स्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय पुन्हा एकदा घ्यावे लागत असून ऑक्सिजन, बेड्स, औषधे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे.
दरम्यान, ज्या सैनिकांचा आपण मातृभूमीचे वीर सुपुत्र म्हणून गौरव करतो, जे जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी जीव देतात त्याच जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाच्या संकटात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातील एका जवानांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या जवानांची स्थिती पाहून नक्कीच आपला देखील व्यवस्थेबाबत संताप होईल.
अनेक सामान्यांना आरोग्य सुविधेच्या गैरसोयीचा सामोरं जावं लागत आहे. अशातच, सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पत्नीची स्थिती खालावत असल्याने जवानाने आपल्याच गाडीतून पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, या जवानाला रुग्णालय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात त्यांना फिरावं लागलं. मात्र त्यांना बेड मिळाला नाही.
यामुळे, अखेर हतबल झालेल्या जवानाला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. आठ तासांपासून त्यांची वणवण सुरु होती. पत्नीला कुठे दाखल करावं याची माहिती त्यांना कोणीच दिली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील ते मदत मागत होते. यानंतर तेथील स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यांनी आपली व्यथा मांडली. यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मदत करून त्यांच्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले.
चार दिवसांपूर्वी पत्नीला लागण झाली होती. मात्र, तेव्हा ते त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावत होते. मात्र, पत्नीची प्रकृती खालावल्याने ते घरी परतले व रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांना वाईट अनुभव आला. माध्यमाच्या प्रतिनिधींकडे आपली व्यथा मांडताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले. ‘आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीयेत,’ असं म्हणत त्यांनी हतबलता व्यक्त केली. या वाक्यांनी आपल्याला देखील प्रशासनावर आणि व्यवस्थेवर राग येईल, कारण जे जवान त्यांच्या कुटुंबियांना सोडून देशासाठी कर्त्यव्य बजावतात आज त्यांना या परिस्थितीमधून जावं लागत असेल तर नक्कीच देशातील स्थिती चिंताजनक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ
- अष्टपैलु खेळाडू रविंद्र जडेजाचा जिवलग ‘वीर’ अनंतात कालवश; पोस्ट शेअर करत दिला निरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
