Share

क्रिकेट विश्वाला कोरोनाचा हादरा ; 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन

Published On: 

🕒 1 min read

जयपूर : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करवी लागत आहे.

संपूर्ण भारतात कोरोनाचा कहर सुरु असताना क्रिकेट विश्वालाही कोरोनाने हादरा दिलाय. राजस्थानचा माजी लेगस्पिनर विवेक यादवचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 36 वर्षी विवेक यादवला कोरोनाच्या लढाईत यश आलं नाही. विवेकने जयपूरच्या एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

विवेकला करोनाआधी कॅन्सरने गाठलं होतं. कॅन्सरच्या उपचारासाठी तो रुग्णालयात गेला कॅन्सरच्या उपचाराअगोदर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीत तो कोरोनाने बाधित आढळून आला. ज्यानंतर त्याच्यावरती उपचार चालू होते. मात्र तो उपचारांना योग्य प्रतिसाद देत नव्हता. अखेर कोरोनाविरुद्धच्या लढाईत तो हरला. कोरोनाने एक उमदा खेळाडू हिरावून नेला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!