Share

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा

Published On: 

उत्तर प्रदेश : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजन अभावी मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र युपी सरकारने (UP Government)या विरोधात दावा केला आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू झालेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी योगी सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे.

विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य दीपक सिंह यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावीपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात किती मृत्यू झाले, याविषयीचा प्रश्न करत राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. या प्रश्नाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह (UP Health Minister Jay Pratap Singh)यांनी लेखी उत्तर दिले आहे.

दरम्यान, देशात एप्रिल ते जून या कालावधीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर पाहायला मिळाला. या कालावधीत हजारो कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे दिसले. तर कधी बेडची कमतरता, लसींचा अपुरा पुरवठा, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा यासर्व प्रश्नांना देशाला सामोरे जावे लागले. यावरूनच विरोधी पक्षाने मोदी सरकारला चांगलेच धरले. मात्र युपी सरकारच्या या दाव्यामुळे मात्र विरोधी पक्षाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!