🕒 1 min read
मुंबई : आत्तापर्यंत आपण खाद्य उत्पादनं, किराणा सामान, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे अश्या गोष्टींचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश होतो असे ऐकले असेल परंतु आता ‘वाईन’चा देखील यामध्ये समावेश होणार आहे. या निर्णयासंदर्भात लवकरच राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’किराणा दुकानात वाईन मिळणार. आता आतुरता किराणा दुकानात मामुच्या परवानगीने हर्बल तंबाखू मिळण्याची. काय राव खरचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
किराणा दुकानात वाईन मिळणार !!
आता आतुरता किराणा दुकानात मामुच्या परवानगीने हर्बल तंबाखू मिळण्याची !!????????
काय राव खरचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !!! ???????? pic.twitter.com/oYYWTSofcE
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 16, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठविले होते. हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा खोचक टोलाही खोत यांनी यावेळी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- ‘बैलगाडा शर्यत आमच्या सरकारमुळेच…’, देवेंद्र फडणवीसांचा दावा
- ‘…राज्य सरकारने आरक्षणात कोणतीही प्रगती केली नाही’, राणेंनी शेअर केली सुप्रीम कोर्टाची ॲार्डर कॉपी
- शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये- मुख्यमंत्री ठाकरे
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
