Share

बाथरूममध्येही लोकांना भेटणारे हे पहिलेच मुख्यमंत्री; केजरीवालांची टीका

Published On: 

नवी दिल्ली : 2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत असून आत्तापासूनच प्रचारसभांनी राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या आम आदमी पक्षाने प्रचाराचा धुळ उडवून दिली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये आधीच सुरू असलेली सुंदोपसुंदी विरोधकांच्या पथ्यावरच पडली असून त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलीत आल्याचं बोललं जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर देखील आपकडून सातत्याने टीका केली जात आहे.

मुक्तसर भागामध्ये एका प्रचारसभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानाची खिल्ली उडवत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. काँग्रेसला वाटलं की कॅप्टन साहेबांकडून पराभूत होऊ, तेव्हा त्यांनी 3 महिन्यांपूर्वी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून टाकलं. चन्नीसाहेब देखील रोज नवनव्या घोषणा करत असतात. पण एक गोष्ट नक्की आहे. याहून मोठं नोटंकी सरकार भारतात आजपर्यंत पाहिलं नाही, असे अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी चरणजीत सिंग चन्नी यांची एक मुलाखत मी टीव्हीवर पाहात होतो. ते म्हणत होते मी तर 24 तास जनतेच्या भेटीगाठी घेत असतो. दिवसभर माझ्या घरी लोकं बसलेले असतात. ड्रॉइंग रुम, व्हरांड्यात लोकं बसलेले असतात. मी बाथरूममध्ये जातो तर तिथेही लोकं येत असतात. तिथेही मी लोकांना भेटत असतो. मला वाटतं जगाच्या इतिहासातले हे पहिलेच मुख्यमंत्री असतील, जे बाथरूममध्ये लोकांना भेटतात, असं म्हणत अरविंद केजरीवाल यानी चरणजीत सिंग चन्नी यांना खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!