औरंगाबाद: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालत राज्य मंत्रिमंडळाचा कुलपतींच्या अधिकारात हस्तक्षेपाविरुद्ध गुरुवारी (दि.१६) अभाविपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जोरदार आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबरला झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले.
विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या अधिवेशनात या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरूची निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपालांनी करावी लागेल. राज्यशासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे.
विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्यापदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष, नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रिया वाढेल. या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो.
सरकारचे वसुलीकडे लक्ष विद्यापीठ केलं भक्ष
विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल. असे मत प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी मांडत सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून विद्यार्थी हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा, यासाठी कुलगुरूंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली. यावेळी सरकारचे वसुलीकडे लक्ष विद्यापीठ केलं भक्ष, शिवसेना भवन, काँग्रेस भवन, राष्ट्रवादी भवन, विद्यापीठाचे केले महाराष्ट्र सरकारने हवन, अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…’, अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आनंद
- ‘बैलगाडा शर्यत आमच्या सरकारमुळेच…’, देवेंद्र फडणवीसांचा दावा
- ‘…राज्य सरकारने आरक्षणात कोणतीही प्रगती केली नाही’, राणेंनी शेअर केली सुप्रीम कोर्टाची ॲार्डर कॉपी
- शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार, पशूधनाचा छळ होऊ नये- मुख्यमंत्री ठाकरे
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

