Share

‘महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटी दर हळूहळू वाढत आहे’, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

जालना : राज्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हळूहळू वाढत असला तरी चिंता किंवा काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण पॉझिटिव्हिटी दर वाढतोय त्याअर्थी टेस्टिंग रेटही वाढवला पाहिजे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री यांना टेस्टिंग वाढवण्याबाबत सुचवले असून मुख्यमंत्र्यांनीही हे मान्य केले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही यात लक्ष द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, २४ तासांत राज्याची स्वॅब टेस्टिंगची क्षमता २ लाखांहून अधिक आहे, ती सध्या सव्वा-दीड लाख पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने टेस्टिंग केल्याच पाहिजेत. जालना जिल्ह्याचा विचार करता आपण दर आठवड्याला बैठक घेतो. तसेच प्रयोगशाळेची दोन-अडीच हजार टेस्टिंगची जी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरली गेली पाहिजे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.

मराठवाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य सुविधा, तसेच दरडोई उत्पन्न वाढविण्याबरोबरच उद्योगांच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होणेही गरजेचे आहे. आपल्या मराठवाडा विभागाबरोबरच जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास अधिक जलदगतीने होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!