🕒 1 min read
बीड: जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये देखील आता जागा मिळत नसल्याने रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. खाटांची संख्या देखील अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना नाहक त्रास्सहान करावा लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनापासून ते सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. त्याचमुळे आता कोरोनाच्या भीतीने नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. मात्र या गर्दीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन कळत-नकळत नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारी एकूण १४३ लसीकरण केंद्रांपैकी ६९ केंद्र सुरू होती. उर्वरीत ७४ केंद्र केवळ लसीच्या तुटवड्यामुळे बंद राहिली. दिवसभरात १२०० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. जिल्ह्यात लसीचा निर्माण झालेला तुटवडा पाहून आणखी दहा हजार लसीचे डोस पुण्याहून आले असून येत्या दोन दिवसांत नागरिकांना ही लस दिले जाणार आहे. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शासनाकडे एक लाख लसीची मागणी केली आहे.
गुरुवारी जिल्ह्यात खासगी सर्व १४ केंद्र केवळ लसीचा साठा नसल्याने बंद होती. त्यामुळे सध्या शासकीय लसीकरण केंद्रांवर रोज गर्दी होत आहे. गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयात २९४ जणांना लस दिली. परंतु दुपारनंतरया केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्यात गुरुवारी एकूण ६९ लसीकरण केंद्रावर १२०० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संजय कदम यांनी दिली. शुक्रवारी व शनिवारी या दिवशी जिल्ह्यात लसीकरणासाठी पुण्याच्या अतिरिक्त आरोग्य संचालक कार्यालयाने बीडसाठी दहा हजार कोविशिल्ड लस पाठवली असून ती आरोग्य विभागाला मिळाली.
कोरोनापासून सुरक्षीत असलो पाहिजे, असे आता प्रत्येकाला वाटू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी उसळत आहे. अशा वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही गर्दी आवरण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. काही गावातच लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. जिल्ह्यात जलदगतीने लसीकरण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि लसीचा पुरेसा साठासुद्धा नसल्याने सध्या अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वेळ जिल्हा आरोग्य विभागावर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आमचं ठरलंय’ नंतर कोल्हापुरात आता ‘गोकुळ चांगलच चाललंय’ पॅटर्नची चर्चा !
- धडाकेबाज खेळी करताना पृथ्वी शॉने रचला ‘हा’ विक्रम
- राज्य संकटात : कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोट्यावधींची मदत
- तुळजापुरात लसीकरणाला ‘ब्रेक’, दोन केंद्र बंद
- ‘चमकोगिरी करण्याची हौस किमान कोरोना साथीच्या काळात तरी बाजूला ठेवायला हवी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
