Share

राज्य संकटात : कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोट्यावधींची मदत

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांना यामुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. अशात घटलेला महसूल, मोफत लसीकरण आणि गरुजांना केलेली मदत यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे. हे संकट पाहून आता अनेक खेळाडू, नेते, अभिनेते यांनी सरकारला मदत केली आहे. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे वेतन आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. तर अभिनेता अजय देवगण, ऑस्ट्रेलियाचे खेलाडू पॅट कमिन्स, ब्रेट ली यांनी देखील भारताच्या या संकट काळात मदतीचा हात दिला आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे एक कोटी तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले.

आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्ष अदिती नलावडे उपस्थित होत्या.

राज्यातील प्रशासन व जनता कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटासोबत जोमाने लढा देत आहे. पण एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढणार आहे. त्यामुळे या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला आहे. खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या साहाय्यासाठी पक्ष नेहमीच तत्पर आहे. अस राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!