Share

‘आमचं ठरलंय’ नंतर कोल्हापुरात आता ‘गोकुळ चांगलच चाललंय’ पॅटर्नची चर्चा !

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ पॅटर्नची चर्चा राज्यभरात रंगली होती. सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत चांगलीच राजकीय खेळी करून विरोधकांना मोठा धक्का दिला होता.

आता या पॅटर्ननंतर जिल्ह्याच प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांमध्ये ‘गोकुळ चांगलच चाललंय’ ची चर्चा होत आहे. सत्ताधारी महादेवराव महाडिक-पी एन पाटील गटाने आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, महाडिक-पाटील यांच्या राजर्षी शाहू आघाडीचा सामना राजर्षी शाहू शेतकरी आघाडीशी होणार आहे. सत्ताधारी गटाने गोकुळ चांगलच चाललंय असं म्हणत ठरावदार मतदारांना आकर्षित केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सत्ताधारी गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असल्याने येत्या २ मे रोजी निवडणूक होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला पाठींबा दिला आहे. तर, सत्ताधारी गटाविरोधात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, मंत्री राजेंद्र राजेंद्र पाटील यड्रावकर आदी दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन दंड थोपटले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!