Share

धडाकेबाज खेळी करताना पृथ्वी शॉने रचला ‘हा’ विक्रम

Published On: 

अहमदाबाद : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

केकेआरच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ एकटाच भारी पडला. या सामन्यात पृथ्वी शॉने शिखर धवनसोबत १३२ धावांची सलामी दिली. या सामन्यात शॉने ४१ चेंडुत ११ चौकार आणि ३ षटकारासह ८२ धावांची धुवांदार खेळी केली. तसेच शॉने केवळ १८ चेंडुत आपले अर्धशतक पुर्ण केले होते. हे त्याचे आणि दिल्लीकडुन सर्वात वेगवान दुसऱ्या क्रमांकाचे अर्धशतक ठरले. कर्णधार रिषभ पंतनेही केवळ १८ चेंडुत अर्धशतक केलेले आहे.

दिल्लीकडून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम हा ख्रिस मॉरीसच्या नावे आहे. मॉरीसने २०१६ साली दिल्लीकडून खेळताना गुजरात लॉयन्सविरुद्ध १७ चेंडुत अर्धशतक झळकावले होते. तसेच आयपीएल २०२१ मधील हे सर्वाधिक वेगवान अर्धशतक ठरले. या स्पर्धेत यापुर्वी पंजाबच्या दिपक हुडाने राजस्थान विरुद्ध २० चेंडुत अर्धशतक झळकावले होते. तर आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा कारनामा हा के एल राहुलने ८ एप्रिल २०१८ रोजी दिल्लीविरुद्ध केला होता. त्यावेळी राहुलने १४ चेंडुत अर्धशतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!