Share

‘चमकोगिरी करण्याची हौस किमान कोरोना साथीच्या काळात तरी बाजूला ठेवायला हवी’

Published On: 

पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. तर, प्रकुर्ती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. राजीव सातव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

यातच काल राजीव सातव यांच्या तब्बेतीची विचारपूस करायला डॉ. विश्वजित कदम जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेले व तिथेच काँग्रेस च्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.कोरोना संकटामुळे लॉकडाउन केला गेला आहे , असे असताना अशी प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागे काय कारण होते? असा सवाल आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या व्यक्तीच्या तब्बेतीबाबत जनतेला काळजी असते पण त्यासाठी हॉस्पिटल बुलेटिन जारी करते अशी सामान्यपणे प्रथा आहे. असे असताना पत्रकारांना तिथे हॉस्पिटलमध्ये बोलवून पत्रकारांनाही जीव धोक्यात घालण्यास लावणे अयोग्य आहे. चमकोगिरी करण्याची हौस किमान कोरोना साथीच्या काळात तरी बाजूला ठेवायला हवी. त्या ऐवजी नवीन व्हेंटिलेटर बेड सुरू करण्यासाठी खटाटोप केला तर पुणेकर या मंत्री महोदयांचे आभार मानतील असे देखील ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!