उस्मानाबाद: मागील महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने लसीकरण अधिक वेगाने करण्याची गरज असताना तुळजापूरात लसीकरण केंद्र लसी अभावी बंद पडले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या दोन लसीकरण केंद्रात ७३०६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम खोळंबली आहे.आजपर्यंत २८०६ कोवॅक्सिन व ४५०० कोविशिल्ड अशा एकूण ७३०६ नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.
१ मे नंतर १८ वर्षापुढील नागरिकांना लस दिली जाणार असल्याने लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असून शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे.लसीकरण आरंभ होताच प्रथमत: लस घेण्यासाठी नागरिक तितकसे उत्सुक नव्हते. मात्र दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घेण्यास सुरुवात केली आहे.
बुधवार व गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयाला लस उपलब्ध न झाल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.लस केव्हा येणार ? याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याने सकाळी नागरिक लसीकरण केंद्रावर येत असून लस उपलब्ध नाही म्हणताच परत जात आहेत. जसाजसा कोरोना प्रादूर्भाव वाढत आहे तसतसा लस घेण्याकडे नागरिकांचा ओढाही वाढत असल्याचे दिसत आहे.लस उपलब्धतेची माहिती एक दिवस अगोदर दिली तर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईची बातच न्यारी; पोलार्डने मारला चक्क हेल्मेटने चौकार
- अनेक लोक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत मात्र कोरोनामुळे थांबलेत, जयंत पाटलांचे मोठे विधान
- सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधासाठी पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करू नका – सर्वोच्च न्यायालय
- गणेश नाईक भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले, अजितदादांचा टोला
- जालन्यात मृतांना स्मशानात ही जागा मिळेना; ‘मुक्तीधाम’मध्ये पहिल्या शेडचे काम अंतिम टप्प्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

