औरंगाबाद : अंशत लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्टमधील डायनिंग सुविधा (आसनावर बसून खाणे) येत्या १७ मार्चपासून पूर्णतः बंद करण्यात येत आहे. याबाबतची माहिती आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. शनिवार, रविवार पूर्णतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. दरम्यानच्या काळात रेस्टॉरंट, हॉटेल, परमिट रूम, नाश्ता सेंटर, धाबे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले.
याठिकाणी जेवताना मास्क काढल्याने प्रादुर्भावाचा धोका अधिक असतो. तसेच अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचही पालन होत नाहीये. त्यामुळे या ठिकाणाहून केवळ पार्सल सेवा अथवा घरपोच सेवा सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जर एखाद्या हॉटेल मालकाने नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘बेळगाव प्रश्नी काही लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप’, कुमारस्वामींनी शिवसेनेला डिवचले
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

