🕒 1 min read
मुंबई : काही दिवसापुर्वी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. आता येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. काही दिवसापुर्वी या दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली.
मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दौऱ्याच्या नियोजीत कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय महिला संघाचा पहिला सामना १९ डिसेंबर रोजी होणार होता. मात्र न्यु साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरीया राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. यामुळे पहिला सामना हा २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तसेच मालिकेतीस सर्व सामने क्वीन्सलँडमध्ये आयोजीत करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. हे सामने पुर्वी सिडनी, मेलबर्न आणि पर्थ येथे होणार होते. मात्र आता हे सर्व सामने क्वीन्सलँडमध्ये मकाय येथील ग्रेट बॅरीयर रिफ एरिना या मैदानावर होणार आहे. तर मालिकेतील एकमेव कसोटी सामना पर्थच्या जागी गोल्ट कोस्ट येथील मेट्रीकॉन मैदानावर होतील. तसेच याच मैदानावर टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियात १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यात कोरोना लाट येतेय म्हणे, लाट यायला समुद्र आहे काय?’, मनसेचा खोचक टोला
- दरड कोसळली: औट्रम घाटात मदतकार्य सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

