🕒 1 min read
मुंबई: राज्यात कोरोनामुळे शासनाने दहीहंडीवर बंदी घातली होती. मात्र शासनाचे सर्व नियम झुगारून लावत मनसेने मुबई, ठाणेसह नाशिकमध्ये दहीहंडी फोडलीच. या कार्यकर्त्यांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. तिसरी लाट येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटले आहे. यावर राज ठाकरे यांनी लाट यायला समुद्र आहे काय, असा प्रश्न करत ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच कुठं काही जाणवतंय का तुम्हाला. उगीच इमारती सील करायच्या, यापूर्वी या देशात कधी रोगराई आलीच नाही का, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना चांगलाच टोला लगावला आहे.
राज्यात सर्व कार्य जोमात सुरु आहेत. महापौर बंगल्यावर रोज बिल्डरांची वाहनं येताना दिसतात. लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. शासनाला जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण-उत्सव नाही. असे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले

