मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय.
या पत्राबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर त्या म्हणाल्या की, ‘त्यांच्या पत्राबाबत आपल्याला माहिती नाही. पण लिहिलं असले तर स्वागत आहे. त्यांनी जे पत्र लिहिलं आहे त्यावरुन सरकारच्या आजच्या परिस्थितीचा अंदाज येतो’, अशी खोचक टीका पंकजा यांनी केली.
सरनाईक ‘जेल’च्या भीतीने चिंताग्रस्त दिसत
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ‘सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर …. जेलचे पाहुणे होणारच’ असा टोला लगावला आहे. ‘शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक “जेल” चा भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर… जेलचे पाहुणे होणारच’ असे सोमय्या म्हणाले.
त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं योग्य नाही
प्रताप सरनाईक त्यांचे आमदार आहेत, नेते आहेत. त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आमचे नेते केंद्रात आहेत. ते विचार करतील. आम्ही त्यांना सांगू. बाकी आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो की, बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्यांच्याविरोधात लढण्यात गेली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं योग्य नाही,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही’, राष्ट्रवादीचा नाना पटोले यांना टोला
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य


