मुंबई : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेला या याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा पुनर्विचार करण्याची मागणीसुद्धा विनोद पाटील यांनी या याचिकेत केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच विनोद पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे कोर्ट या याचिकेची दखल घेते का? त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं होतं. यावेळी कोर्टाने काही निरीक्षणे नोंदवली होती. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नाही. आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली होती. हे नियमांचं उल्लंघन होतं. परंतु परिस्थिती तशी नव्हती, असं घटनापीठाने म्हटलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण का द्यावं? याबाबत गायकवाड समितीनेही काहीच स्पष्ट केलं नव्हतं. गायकवाड समितीच्या अहवालात त्याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नव्हता, असं जस्टीस अशोक भूषण यांनी म्हटलं होतं.
या निकालानंतर केंद्र सरकारच्या वतीनंही एक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारनं दाखल केलेली याचिका केवळ 102व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर होती. म्हणजेच, नवा प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आहेत की, राज्यांनाही आहेत? या मुद्द्यावर होती. पण मराठा आरक्षणासंदर्भातील मूळ प्रश्नांवर आतापर्यंत कोणतीही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील मूळ प्रश्नांवर विनोद पाटील यांनी दाखल केलेली ही पहिली पुनर्विचार याचिका आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
- दिनेश कार्तिक बनला ‘वेदर मॅन’, स्वत:च केला खुलासा
- साऊथम्पटनमधील पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा ; टीम इंडियाच्या कोचचं भाकीत
- रोहित आणि गील यांनी रचली 10 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी


