Share

मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार

Published On: 

नाशिक : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक नाशकात होत आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे. सोमवारी (दि. २१) नाशिक येथील नियोजित मूक मोर्चा झाल्यानंतर, खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत समन्वयकांची आत्मचिंतन बैठक होणार आहे.

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा नाशिककडून आंदोलनाबाबतच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात उपस्थित राहावे व मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आंदोलनास उपस्थिती लावावी. यासाठी त्या त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात नाशिक येथे नियोजित मूक मोर्चा आंदोलन सोमवारी सकाळी नऊ वाजता नाशिकमधील गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात हॉलशेजारील मैदानात होणार आहे. खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनास, जिल्ह्यातील मराठा समाज व आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!