Share

‘इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही’, राष्ट्रवादीचा नाना पटोले यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं,अशी इच्छा व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली.

‘नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इच्छा व्यक्त करायला हरकत नाही, पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

‘लोकशाहीत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. बहुमत असलेल्या पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करावे, हा त्या पक्षाचा निर्णय असतो. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे योग्य नाही. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही, असा टोला पटोले यांना लगावला.

शिवसेना आणि काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांना अजून वेळ आहे. त्यावर आताच काही बोलणे शहाणपणाचे नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी- शिवसेना युती झाल्यास चमत्कार घडेल, असे संजय राऊत म्हणाले. त्यावर पटेल म्हणाले, की यावर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी निवडणुकीसंदर्भातला निर्णय हा २०२३ नंतर घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे यावर आताच काही बोलता येणार नाही, असे पटेल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!