🕒 1 min read
इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहीलेला जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना अखेर दुसऱ्या दिवशी सुरु झाला. न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. 3 गडी गमावत 146 धावांची मजल मारली होती. मात्र अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
हा सामना सुरु होताच क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारताने हा सामना जिंकावा, यासाठी क्रिकेटप्रेमी देवाकडे प्रार्थना करत आहेत. सामना जिंकावा म्हणून चाहते अजब-गजब अटी देखील देवासमोर ठेवताना दिसत आहेत. त्यातच बॉलिवूडची अभिनेत्री पूनम पांडे देखील आहे.
पूनमने पुन्हा एकदा भारताने हा सामना जिंकलाच तर कपडे उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. याआधी तिने वर्ल्ड कपदरम्यान सुद्धा तिने अशीच घोषणा केली होती. 2011 साली वर्ल्ड कप दरम्यान पूनमने भारत जिंकला तर नग्न अवस्थेत मैदानावर धावेन, असे तिने म्हटले होते. पण तिने त्यावेळी तस केलं नाही बीसीसीआयने परवानगी नाकारल्याचे कारण पुढे करत तिने हा प्रकार टाळला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पूनमने तशीच तयारी दर्शवली आहे.
‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत तिला भारत आणि न्यूझीलंडची मॅच सुरू आहे, यावर काही प्रतिक्रिया देणार का? असा प्रश्न विचारला त्यावर तिने ‘क्रिकेट चालू आहे? मग मी पुन्हा स्ट्रिप होण्याचे बोलू, अशी तुमची इच्छा आहे का? टीम इंडिया यावेळी जिंकल्यास मी स्ट्रीप करेन, अर्थात माझी तयारी आहे. पण करायचं की नाही तुम्ही ठरवा,’ असे ती यावेळी म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
- गिलला बॉल लागताच सिराजने केले असे काही ; होत आहे कौतुक
- ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’
- ‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट
- ‘पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत’, महापौरांचा हल्लाबोल
- इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
