🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या कोरोना मुक्त गाव या घोषणेनेला प्रतिसाद देत शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना औरंगाबाद शाखेच्यावतीने ५ जून ते १९ जून पर्यंत निर्धार कोरोना मुक्त गाव मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, अनावश्यक गर्दी टाळा या सूचनांचे पालन व तसेच गावात असलेली कोरोना बाधित रुग्णांची परिस्थिती व रुग्ण संख्या कमी करण्यासाठी इतरही उपाय योजना बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्हा कोरोना मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळवले आहे.
शिवसेना नेते पालक मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मनीषा कायंदे ,आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार रमेश बोरणारे, आमदार उदय सिंग राजपूत, माजी आमदार आर. एम. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ५ जून शनिवार रोजी गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातून या मोहिमेची सुरुवात होणार आहे.
यामध्ये सकाळी १० वाजता घोडेगाव, १०:४५ वाजता गोळेगाव, ११:३० वाजता खाडे पिंपळगाव, १२:१ वाजता भांडेगाव, २ वाजता कानडगाव या गावात जनजागृती करण्यात येणार आहे यावेळी त्या-त्या विभागातील शिवसैनिक, पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर : मोठ्या झुंबरासह पीओपी स्लॅब कोसळला अन् आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
- …तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठींबा असेल – संजय राऊत
- शेतकऱ्यांना वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे, अजितदादांनी भरला दम
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’

