Share

‘चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाची बदनामी केली, गुन्हा दाखल करा’, बीडमध्ये तक्रार

Published On: 

बीड : गेल्या 20 दिवसांपासून राज्यभरात परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. या अनुषंगाने दैनंदिन अनेक नवीन घडामोडी घडत आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्याविरोधात मोठे आंदोलन केले. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर होत्या. मात्र, बीड जिल्ह्यात यावरूनच वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरुणी आणि बंजारा समाजाची बदनामी करत असल्याचे कारण देत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावी अशी तक्रार बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बीडच्या शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अॅड. संगीता चव्हाण यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यात तक्रारी म्हटले आहे, की युवतीचे अशोभनीय फोटो, ऑडिओ क्लिप, व्हिडिओ वारंवार प्रसारित करुन व पीडित युवतीचे चारित्र्याचे हनन करुन, बंजारा समाजाची नाहक बदनामी करणे, बंद फ्लॅटमध्ये कोणाची परवानगी न घेता गृह अतिक्रमण करुन बंद फ्लॅटमधून मोबाईल व लॅपटॉप चोरुन स्वतःच्या फायद्याकरिता गैरवापर केला जात आहे.

वेळीवेळी कायद्याचे उल्लंघन करून, बेकायदेशीररित्या जमाव करुन मोर्चा, आंदोलन करुन कायद्याची पायमल्ली करणे, पीडिता, तिचे आईवडिल, नातेवाईकांची आणि बंजारा समाजाची नाहक बदनामी करण्यात आली. तसेच वानवडी पोलीस ठाणे, पुणे येथे २५ फेब्रूवारी रोजी संत सेवालाल महाराजांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने घोषणा करून बंजारा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

त्यामुळे दोषींवर भारतीय दंड संहिता १८६०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००, स्त्री अशिष्ठ रुपन प्रतिबंध अधिनियम १९८६, आपत्ती व्यवस्थापन कायदा २२०५, महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२० महामारी रोग अधिनियम १८९७, आदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी अॅड. चव्हाण व राठोड यांनी तक्रारीत केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!